गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली भागात असलेल्या सोमनपल्ली या गावात गेल्या २०१७ / २०१८ या वर्षी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत कोत्तुर ते सोमनपल्ली गावात आसरअल्ली ते पतागुडम जाणाऱ्या महामार्गाला जोडून चंद्र सलाय्या वेलादी ( ग्राम पंचायत सदस्य) यांच्या घरापर्यंत लाखो रुपयांची डांबरी कारण रस्त्याची मंजुरी झाली आहे,
त्यावेळी संबंधित ठेकेदारांनी मंजुरी असलेल्या रस्त्याचे काम सुरुवात केली होती, त्या रस्त्यावर मुरूम, आणि एक कलवाट बांधून अर्धे रस्त्याचे बांधकाम करून सोडून दिले आहे,
आणि तीन / चार वर्षानंतर पुन्हा सोमनपल्ली गावात येऊन मंजुरी असलेल्या रस्त्याचे कामे न करता नवीन रस्त्य दुसऱ्या ठिकाणी सोमनपल्ली (माल) वार्ड क्र -१ मध्ये रस्त्याचे डांबरी कारण रास्त सुरुवात केली आहे,
आम्ही सर्व ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारांना विचारले असता त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही,
आज सोमनपल्ली गावात सुरु असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे संपूर्ण निकृष्ट दर्जाचे कामे केली जात आहे,
संबंधित ठेकेदारांनी मनमानी रस्त्याचे बांधकाम करीत आहे,
सुरू असलेल्या डांबरी कारण रस्त्याचे बांधकामाला सखोल चौकशी होईपर्यंत रस्त्याचे बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावे,
अन्यथा आम्ही सर्व सोमनपल्ली गावकऱ्यांनी येत्या 10 दिवसात 2 डिसेंबर रोजी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे तहसीलदार जितेंद्र सिकतोडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे इशारा निवेदनातून केली आहे,
तालुका प्रतिनीधी सिरोंचा
राजमोगली एम दुर्गम