सुरजागड लोहप्रकल्प भूत शेतकरी व सर्वसामान्यांच्या डोक्यावर

230

 

विक्रम बेताला सारखी झाली अवस्था

सुटता सुटे ना ?

अहेरी ;-गडचिरोल्ली जिल्हाची ओळख ही मागासवर्गीय जिल्ह्या म्हणून ओळख आहे गडचिरोल्ली जिल्ह्यात अजून ही सोयी सुविधेचा अभाव आहे त्या मध्ये अहेरी उपविभातील पाच तालुके अहेरी एटापल्ली सिरोंचा मूलचेरा व भामरागड ही तालुके अतिदुर्गम मानले जातात

ही तालुके नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वृत्तपत्राच्या फ्रंट वर येत असतो
या भागामध्ये मुख्य पीक म्हणून कापूस आणि धान आहे त्या साठी लागणारा खर्च देखील शेतकरी पीक कर्जातून काढतात तसेच व कसे बसे शेतीला चालना देतात

यात सुरजागड प्रकल्प हा जिल्ह्यात आला तेव्हा तेव्हा जिल्ह्याचा आता कुठे तरी विकास होईल बेरोजगाराच्या हाती काम मिळेल आरोग्य सुविधा वाढेल जिल्ह्याची आमदनी वाढेल विकास होईल अश्या मोठं मोठी स्वप्ने दाखवायला लागली परंतु हाच प्रकल्प बोकांडी बसला विक्रम बेताला सारखी हाल झाली (समस्या सुटता सुटेना) सुरजागड प्रकल्पामुळे अहेरी उपविभागात शेतकाऱ्यांपासून सर्वसामान्यांपासून गरोदर मतांपासून शाळकरी मुलांपासून तर रस्त्यांची सुद्धा दयनीय अवस्था झाली आहे

कधी अपघाताचे कारण कधी रस्त्याचे प्रश्न कधी पीक नुकसानीचे कारण या एका सुरजागड प्रकल्पामुळे घडत आहे

सुरजागड प्रकल्प हे अहेरी उपविभागासाठी श्राप की वरदान आहे बोलले जात आहे या लोहखनिज वाहतुकीच्या धुळीमुळे रस्त्यावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे ऐन पीक हातात येता येता या सुरजागड प्रकल्पाच्या वाहतुकीमुळे आलेला पीक हातातून चालला शेतकऱ्याला उपासमारीची वेळ आलेली आली आहे कर्जबाजारी होण्याची वेळ सुद्धा येऊन पडाली

लहान मोठे लोकप्रतिनिधी व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या वातानुकूलित वाहनांमध्ये फिरल्यामुळे त्या लोकांना या धुळीचा व त्या खड्ड्यांचा त्रास सहन समजत नाही आहे हे विशेष

अनेक लोकांचे वॉटर पॉल्युशन मुळे व एअर पॉल्युशन मुळे पोटातले आतड्या आणि फेबडे खराब होण्याच्या मार्गावर रस्त्यावर पडलेल्या खड्यात साचलेल्या पाण्यासकट मुक्या जनावरांच्या पोटात आयरण चाललं मनुष्य तर सोडा मुक्या जनावरांना ही शाप ठरला जोपर्यंत लोह दगडाचा वाहतूक स्वतंत्र कॉरिडॉर किंवा पाईपलाईन होत नाही तो पर्यंत उत्खनन बंद करून पर्यावरणाच्या समतोल राखवा. असे सर्वसामान्य जनतेचे म्हणणे आहे.व शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची माफी द्यावी अशी मागणी होत आहे

 

*बॉक्स*

लोहखनिज वाहतुकीच्या धुळीमुळे होणाऱ्या शेतीचे नुकसान भरपाईची शासनाने जवाबदारी घेऊन शेतकऱ्यांचे पीक कर्ज १००% माफ करावे व आर्थिक मदत द्यावे

*संतोष ताटीकोंडवार*
*अध्यक्ष अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समाजोनती समिती गडचिरोल्ली*