प्रतिनिधी//
आज दिनांक १८ मे २०२५ (रविवार) रोजी गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार साहेब गट) च्या प्रदेश सरचिटणीस मा. अतुल वादिले साहेब यांनी जिल्हा पातळीवरील पक्षाच्या कार्याचा व संघटनात्मक घडामोडींचा आढावा घेतला.
या बैठकीस अध्यक्षस्थानी सौ. भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) होत्या. विशेषतः अहेरी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी, संघटनात्मक समस्या आणि भविष्यातील दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मा. अतुल वादिले साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांचे मुद्दे समजून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला व योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले.
पक्ष संघटनेचे बळकटीकरण व स्थानिक पातळीवरील सक्रियता वाढवण्यासाठी हा दौरा अत्यंत फलदायी ठरला.
शाम धाईत प्रदेश सरचिटणीस, संजय कोचे, इंद्रपाल गेडाम सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष जितेंद्र टिकले नगर सेवक एटापली , श्रीनिवास वीरगोनवार, ज्ञानकुमारी कोशी माजी जी. प. सदस्य, गीता दुर्गे, इमला गावडे, माया सुनतकर, सालया कंबलवार, टाटाजी गेडाम, स्वप्नील श्रीरामवार, उमेश कोरेत, सुरेश गुंडावार, मिलिंद अलोने,विजय बोरकुटे, अरुण रामटेके,हरीश गाडला, राजेश बदी, मयुर पुपलवार,.शेख इस्माईल,विशाल रंगू, एम. डी. शानू, विनोद चव्हाण, रेणू हिचामी, विष्णू रॉय, सुभाष आत्राम, अक्षय कविराजवार, शैलेश गेडाम, संतोष येमुलवार, मधुकर चिलनकर, सुमित मोतकुरवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते