देसाईगंज शहरातील कथित सिएमआर कार्यालयाची जी हुजुरी करणारे ते शासकीय अधिकारी कोण कार्यालयासमोर उभ्या गाडीने देसाईगंज शहरात एकाच चर्चेला उधाण

104

देसाईगंज-
गडचिरोली जिल्ह्यात मागील २०२१ पासुन सिएमआर मिलींग मध्ये प्रचंड गैरव्यवहार सुरू आहे.दरम्यान सिएमआर मिलींग गैरव्यवहाराचा मास्टरमाईंड असलेल्या देसाईगंज येथील कुप्रसिद्ध उद्योगपतीचे जिल्ह्यातील कुरखेडा येथील शासकीय गोदाम,आरमोरी येथील शासकीय गोदाम, गडचिरोली येथील शासकीय गोदाम तसेच अहेरी,मुलचेरा, गडचिरोली येथील शासकीय गोदामात सदर तथाकथित उद्योगपत्याकडून शासनाचे सिएमआर तांदुळ जमा करण्याकरीता किरायाने घेतलेल्या गोदामातून पाठवण्यात आलेले मानवी खाण्यास अयोग्य तांदुळ रंगेहाथ पकडण्यात आले आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार चव्हाट्यावर आले मात्र सदर तथाकथित उद्योगपत्यावर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नसतांनाच देसाईगंज येथील तंबाखू लाईनीत कथीत सिएमआर मिलींग कार्यालयासमोर मात्र संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या नेहमीच उभ्या राहात असल्याचे दिसून येत असल्याने शहरातील सिएमआर मिलींग कार्यालयाची जी हुजुरी करणारे ते शासकीय अधिकारी कोण?या एकाच चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
सिएमआर मिलींग घोटाळ्याचा मास्टरमाईंड असलेल्या तथाकथित उद्योगपत्याने देसाईगंज येथील तंबाखू लाईनीत कथीत सिएमआर मिलींग कार्यालय उभारले असुन येथुनच मोठ्या प्रमाणात वसुलीचे रॅकेट चालवल्या जात असल्याचे सांगीतले जात आहे.काहिच वर्षापुर्वी एकवेळच्या खाण्याचे वांदे असतांना अल्पावधित कोट्याधिश बनलेल्या तथाकथित उद्योगपत्याने नकली नोटा चालवून प्रचंड बेनामी संपत्ती अर्जीत केली असुन अलिकडे सत्ताधाऱ्यांच्या मागेपुढे फिरत असल्याचे दिसून येत असल्याने सदर सिएमआर मिलींग घोटाळ्यातील मास्टरमाईंडच्या डोक्यावर सत्ताधाऱ्यांचा हात तर नाही ना?याही चर्चेला उधाण येऊ लागले आहे.तरीही अल्पावधित कोट्याधिश झालेल्या कथित उद्योगपत्याची बेनामी संपत्ती तसेच बेकायदेशीर व्याजाचा धंदा इन्कमटॅक्स विभागाच्या नजरेत भरू नये,याबाबत आता सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
देसाईगंज येथील कथित सिएमआर कार्यालयातुन प्रचंड घोटाळ्याचे सुत्र हलविले जात असल्याचे धक्कादायक वास्तव असतांना आदिवाशी विकास महामंडळ नाशिक यांची एमएच-15 डिएल- 5151व एमएच-15 एए-237,आदिवासी विकास महामंडळ कार्यालय गडचिरोली यांची एमएच-15 एचक्यु-6098 या शासकीय गाड्या तसेच तत्कालिन आदिवासी विकास महामंडळ अहेरीचे उपप्रादेशिक अधिकारी बालाप्रसाद बरकमकर यांची खाजगी गाडी एमएच-26 सीई-0893 व तत्कालिन जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली प्रकाश सौदाजी आघाव पाटिल यांची एमएच-15 जीएल -3909 या खाजगी गाडी मात्र गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिले राहात असल्याने व जेव्हाही जिल्ह्यात मानवी खाण्यास अयोग्य तांदुळ पकडण्यात आला असता कार्यालयासमोर गाड्या तासन्‌तास उभ्या राहात असल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या गाड्या उभ्या ठेवण्यामागचे कारण हुडकून काढल्यास फार मोठे रॅकेट हाती लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.दरम्यान देसाईगंज पोलीस ठाण्याचा एक पोलीस अधिकारी देखील सदर कार्यालयाचे वारंवार खेटे झिजवत असल्याने व कथित सिएमआर मिलींग मास्टरमाईंड अनेक अधिकाऱ्यांनी केलेली वसुली हवालाच्या माध्यमातून सफेद करवून देण्यात माहिर असल्याने सिएमआर कार्यालयाची जी हुजुरी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडेही आता संशयाच्या नजरेने पाहिल्या जात असुन भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी तर सदर कार्यालयाची जी हुजुरी केली जात नाही ना?असा प्रश्न आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे.
सिएमआर मिलींग घोटाळ्यातून दरवर्षी किमान पाचशे कोटीच्या वर घोटाळा केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.हा घोटाळा गोरगरीबांच्या माथी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून मानवी खाण्यास अयोग्य तांदुळ मारून केल्या जात असला तरी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे मात्र कोट्यावधिचे बंगले उभे होऊ लागल्याने ७० ते ८० हजार रुपये वेतनावर कार्यरत अधिकाऱ्यांकडे कोट्यावधिचे बंगले बांधण्याकरीता एवढा पैसा येतो कुठुन?याची सखोल चौकशी केल्यास या घोटाळ्याचा मास्टरमाईंड असलेला देसाईगंज येथील छोटा बागडबिल्ला आपोआपच गळाला लागणयाची दाट शक्यता आहे. मात्र इथे कुंपनच शेत खात असल्याने दाद मागणाराने मागायची कुणाकडे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.विषेश म्हणजे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा ढोल पिटणारेच चोराट्याला संरक्षण देत असल्याने व शासकीय गोदामात वारंवार मानवी खाण्यास अयोग्य तांदळाचा पुरवठा करून गोरगरीबांना एकवेळच्या अन्नाला मुकावे लागण्याची वेळ आणली जात असल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीबांनी आता कायदा हातात घेऊन आपला हक्क अबाधित राखावा काय?असा प्रश्न उपस्थित होत असल्याने जबाबदार अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून सिएमआर मिलींग कार्यालयाची जी हुजुरी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करून जिल्ह्यात सुरु असलेल्या सिएमआर मिलींग घोटाळ्याचे पाळेमुळे खणून काढून गोरगरीबांच्या टाळुवरची लोणी खाणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.तथापी याबाबत काय कारवाई केली जाते याकडे येथील नागरीकांचे लक्ष लागून आहे.