सिएमआर मिलींगमध्ये अनियमितता : किशोर कहऱ्हाडेंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे मागणी…
जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील माँ शारदा फुड प्रॉडक्टच्या संचालिका भारती राहुल मोटवानी यांनी पणन हंगाम २०२२-२३ ला सिएमआर मिलींग मध्ये अनियमितता केल्याने त्यांचेवर जीवनावश्यक वस्तु अधिनियमांतर्गत कारवाई करण्याची मागणी देसाईगंज सिटीझन फोरमचे अध्यक्ष किशोर कहाडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री ना. अजित पवार यांचेकडे केलेल्या तक्रारीतुन केली असल्याने राईसमिल वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
कऱ्हाडे यांनी ना. पवार यांचेकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड
येथील माँ शारदा फुड प्रॉडक्ट हे मिल उसणा तांदुळ तयार करणारे राईसमिल असुन संबंधित मिलच्या संचालिका यांनी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासनाने खरेदी केलेल्या धानाची भरडाई करीता अटी व शर्थीच्या अधिन राहुन धानाची उचल केली आहे. उचल केलेल्या थानापासुन तांदूळ तयार करणे आवश्यक सदर असताना सदर मिल संचालिकेने त्यापासून उसणा तांदूळ तयार करुन खुल्या बाजारात विकले. दरम्यान काळ्या बाजारातील मानवी खाण्यास अयोग्य तांदुळ
स्थानिक पुरवठा विभागातील गुणनियंत्रण अधिकारी तसेच पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचे संगनमताने शासन जमा केले. कुरुड येथील माँ शारदा फुड प्रॉडक्ट मिलच्या संचालिका भारती मोटवानी यांनी शासनाकडून ३६ हजार ३०१. ०६ क्विंटल धानाची उचल केली. धानाची भरडाई करण्याकरीता २९ हजार ०.४१ युनिट वीज खर्च करावयास पाहिजे होते. परंतु प्रत्यक्षात १८ हजार ३३५ युनिट वीज खर्च केले आहे. भरडाईच्या तुलनेत त्यांनी
तब्बल १० हजार ७०६ युनिट वीज कमी खर्च केले असुन सदर मिलमध्ये उसणा तांदूळ तयार करण्यात येत असल्याने त्यांनी खर्च केलेले वीज युनिट हे त्यांनी उसणा तांदूळ तयार करण्याकरीता खर्च केले आहेत.
यावरून त्यांनी प्रत्यक्षात शासनाकडून भरडाई करीता घेतलेल्या धानाची भरडाई केली नसल्याचे सिद्ध होत होत असुन त्यांनी शासनाला जमा केलेला सिएमआर तांदूळ हा काळ्या बाजारातील निकृ ष्ठ तांदूळ असल्याचे दिसून येते. सिएमआर तथापी संबंधित राईसमिलर्सनी शासनाकडून भरडाई करीता किती धान घेतले, खुल्या बाजारातुन किती धान खरेदी केले तसेच शासनाला किती तांदूळ जमा केले व बाजारात किती तांदूळ विकले याची चौकशी करण्यात आल्यास संबंधित राईसमिलर्सचे या व्यतिरिक्त अनेक घबाड उघडकिस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात
येत आहे. विशेष म्हणजे माँ शारदा फुड प्रॉडक्ट तसेच जय अम्बे राईसमिलचे संचालक कथित वादग्रस्त काँग्रेस नेते जेसा मोटवानी यांच्याच परिवारातील असुन एकाच परिसरात सुरु आहेत. यापैकी जय अम्बे राईसमिल ५ हजार ६३१ क्विंटल शासकीय धानाची अफरातफर केल्यामुळे गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी ३० एप्रिल २०२५ रोजी त्यांना ३ वर्षाकरीता काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे संदर्भिय प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अनियमितता करणाऱ्या माँ शारदा मिलींगमध्ये फुड प्रॉडक्टच्या संचालिका भारती मोटवानी यांचेवर जीवनावश्यक वस्तु अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच या गैरव्यवहारात त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी केलेल्या तक्रारीतुन केली आहे.