प्रतिनिधी//
अहेरी येथे दही हंडी जल्लोषात
प्रेक्षकांची अलोट गर्दी
आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या तर्फे 51 हजाराचे पारितोषक
व्येंकटरावपेठा येथील टीम विजेते ठरली!
*अहेरी*: येथील मुख्य चौकात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे शनिवार 16 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्य भव्य दही हंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उदघाटन सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांनी केले. अध्यक्षस्थानी युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून अमित बेझलवार होते.
या प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांनी, कोणत्याही स्पर्धेत व खेळात चिकाटी, जिद्द, परिश्रम लागते त्यातून खिलाडीवृत्ती येते आणि खिलाडीवृत्तीतुनच सर्वांगीण विकास साधता येते असे म्हणत मोलाचे मार्गदर्शन केले.
दहीहंडी स्पर्धेकरिता आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या कडून शिल्ड व 51 हजाराचे पारितोषक होते. दहीहंडी स्पर्धेत प्रेक्षकांची अलोट गर्दी होती. डीजेच्या तालावर दहीहंडी जल्लोषात झाले. व्येंकटरावपेठा येथील गोंडवाना ग्रुपच्या चम्मुनी दहीहंडी फोडून विजेते ठरले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीकांत गदेवार यांनी मानले. यशस्वितेसाठी आदित्य जक्कोजवार, सचिन येरोजवार, अक्षय संतोषवार, देवेंद्र खतवार, स्वप्नील सल्लावार आदींनी परिश्रम घेतले.