गडचिरोली येथे वीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन.

68

प्रतिनिधी//

आज दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी आदिवासी परधान समाज मंदीर, गांधी वार्ड क्रं,११ गडचिरोली येथे १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला आदिवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी,विनोद सुरपाम, महेंद्र मसराम, अजय सुरपाम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या शौर्याचा इतिहास कित्येक भावी पिढयांसाठी सदैव प्रेरणा देणारा असेल. असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी रुपेश सलामे, विजय सुरपाम,आकाश कुळमेथे, अंकित कुळमेथे,नंदकिशोर कुंभारे,नितीन शेडमाके,राज डोंगरे,मनोज मेश्राम,नेहाल मेश्राम, सुधीर मसराम, साहिल गोवर्धन, वैभव रामटेके, साहिल शेडमाके, अंकुश बारसागडे, मिलिंद मेश्राम,महादेव कांबळे, महेश गेडाम, यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.