-
संविधान सन्मान बाईक रॅलीत होणार सहभागी
गडचिरोली:- अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोलीची बैठक दि.२२/११/२०२३ रोजी संपन्न झाली.या बैठकीत संघटना वाढ व विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली. व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी
संविधान फाउंडेशन व मूव्हमेंट फॉर जस्टिस गडचिरोली द्वारा आयोजीत संविधान सन्मान बाईक रॅलीत आदिवासी विकास युवा परिषद सहभागी होणार असून संघटनेचा वतीने सहभाग दर्शवण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून आणि त्यागातून निर्माण केलेले भारतीय संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाचे सुरक्षा कवच आहे. जुन्या ब्राम्हणी व्यवस्थेने जात म्हणून काही समूहांना तर व्यक्ती म्हणून प्रत्येकाला बंदिस्त केले होते. ती व्यवस्था उलथवून संविधानाने नवीन व्यवस्था निर्माण केली आणि नागरिक म्हणून, समूह म्हणून प्रत्येकाला स्वातंत्र्य बहाल केले. जोपर्यंत हे संविधान आहे, तोपर्यंत सर्वांचे स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे.
त्यामुळे प्रत्येकाने संविधानाप्रति जागरूक राहण्याची व त्याच्या रक्षणासाठी तत्पर राहण्याची गरज आहे. अन्यथा जसे अनेक देश अराजकतेमुळे बरबाद झाले, तिथल्या नागरिकांचे जे हाल झाले, तसे आपल्या देशाचे आणि नागरिकांचेही व्हायला वेळ लागणार नाही. देश वाचवायचा असेल तर संविधान वाचवलंच पाहिजे.
त्यामुळे अनुसुचित जाती, जमाती , इतर मागासवर्गीय यांनी एकत्रित येणे काळाची गरज आहे असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोली जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, सामाजिक कार्यकर्ते सतिश कुसराम,रुपेश सलामे, भुषण मसराम, कैलाश गेडाम, डेव्हीड पेंद्राम, राज डोंगरे,मयुर कोडापे,उदय नरोटे, ,रोहीत आलाम, आशिष कुमरे, राजेश कोरामी, के. आशिष आदि उपस्थित होते.