लोकमान्य विद्यालयाचे बाॅक्सर्स विभाग स्तरावर

48

भद्रावती,दि.१८:-नुकत्याच चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडांगणावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय बाॅक्सिंग स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालयाच्या दोन बाॅक्सर्संनी विजय मिळवला असून ते आता विभागास्तरावर खेळणार आहेत. 
      जयंत प्रमोद कुमरे या खेळाडूने १७ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत विजय मिळविला, तर आरुषी मंगेश बेतवार या खेळाडूने १४ वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत विजय मिळवला. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू आता विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 
      हे दोन्ही विजयी खेळाडू आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, प्रशिक्षक लता इंदूरकर, शिक्षक देवीदास जांभुळे, रवी नंदनवार यांना देतात. त्यांच्या यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशालता सोनटक्के, उपमुख्याध्यापक सचिन सरपटवार, पर्यवेक्षक रुपचंद धारणे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.