लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेझिंग डे निमित्य दिली पोलिस स्टेशनला भेट

53

भद्रावती,दि.८:- महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनाच्या शुभ पर्वावर दि.२ ते ८ जानेवारी पर्यंत आयोजित रेझिंग डे सप्ताहाअंतर्गत येथील लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच भद्रावती पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिस स्टेशनच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली.
     यावेळी पोलिस निरीक्षक गोपाल भारती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्याशी हसतखेळत संवाद साधला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार यांनी पोलिस स्टेशनच्या कामकाजाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यात  डायल ११२, स्टेशन डायरी, मुद्देमाल मोहरर रुम, सी.सी. टीव्ही कट्रोल रुम, बारनिशी रूम, पोलिस कोठडी, शस्त्रे, सायबर क्राईम, मोबाईलचे दुष्परिणाम इत्यादी बद्दलच्या माहितीचा समावेश आहे. तसेच पो.स्टे. हद्दीतील ऑटो वाहन व इतर वाहनावर लाल, पिवळे, हिरवे रेडीयम लावून वाहतुक नियम पाळण्याबाबतच्या सूचनाही पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार यांनी दिल्या. 
      यावेळी पोलिस कर्मचारी, लोकमान्य विद्यालयाचे शिक्षक राजकुमार हातझाडे, सचिन कुमार मेश्राम, शिक्षिका शुभांगी खोब्रागडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.