आदिवासी माना जमातीचा राष्ट्रीय उपवर-वधू परिचय मेळावा २८ व २९ जानेवारी रोजी

62

भद्रावती,दि.२१:-येथील माना जमात वधू-वर सूचक मंडळातर्फे आदिवासी माना जमातीच्या राष्ट्रीय उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन दि.२८ व २९ जानेवारी रोजी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील माॅ माणिका देवी मंदिर परिसरात करण्यात आले आहे. 
      दि.२८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता वर्ग ८ ते १० करिता स्पर्धा परीक्षा, त्यानंतर महिलांकरिता हळदी-कुंकू, पथनाट्य, हुंडा न घेणाऱ्या जोडप्यांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. 
      दि.२९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रश्नमंजुषा, ११ वाजता वधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन, स्मरणिका प्रकाशन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, कार्यकर्ता गौरव पुरस्कार वितरण, मान्यवरांचे मार्गदर्शन, उपवर-वधू परिचय आणि सामुहिक विवाह सोहळा आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. मेळाव्यात वर आणि वधू पक्षांकडून केवळ एक रुपया नाममात्र शुल्क घेऊन विवाह लावून देण्यात येईल. कोरोनाची परिस्थिती पाहून कार्यक्रम रद्द किंवा त्यात बदल करण्याचा निर्णय वेळेवर घेण्यात येईल.
     स्मरणिकेकरिता समाजप्रबोधनपर लेख, कविता, उपवर-वधुंची सविस्तर माहिती, फेब्रुवारी/मार्च २०२२ च्या दहावी/ बारावीच्या परीक्षेत ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या जमातीमधील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेराॅक्स प्रत दि.१७ जानेवारी पर्यंत संजय गायकवाड, सुरक्षानगर, श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रार्थना सभागृहाजळ, भद्रावती या पत्त्यावर पाठवावे. अधिक माहितीकरिता संजय गायकवाड (मो.९९२१९८९८२५), दत्ता नन्नावरे ( ८३२९९८१८१७), मनिष केदार (९९७५९१९८१८) व अमोल हनवते (मो.८०८७२७४८७३) यांच्याशी संपर्क साधावा व मेळाव्याला आदिवासी माना जमात बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी केले आहे.