टायगर ग्रुपच्या पुढाकाराने कत्तलिसाठी जाणाऱ्या ८० गोवंशाने भरलेले ३ ट्रक पोलिसांच्या ताब्यात

42

रेपनपल्ली:गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ३ महिन्यात गौ तस्करी करणाऱ्या   ६ ते ७ ट्रक  टायगर ग्रुपच्या सदस्यांन मार्फत पकडण्यात आले होते  त्याच प्रमाणे छत्तीसगडमधून आलापल्ली सिरोंचा मार्गाने हैदराबादकडे ३ ट्रक जनावरांनी भरलेले जात असल्याची माहिती टायगर ग्रुपच्या सदस्यांना मिळाली तात्काळ सदर माहिती पोलिस प्रशासनला देत रेपनपल्ली येथे नाकाबंदी करण्यात आले . वेळेस ग्रुपचे सदस्य पाटलाग करून त्यांना रेपणपल्ली येथे नाकाबंदी दरम्यान पकडण्यात आले पोलिसांना पाहताच तीनही ट्रकचालक पसार होण्यात यशस्वी झाले.
प्राप्त माहितीनुसार, ही जनावरे छत्तीसगडमधून हैदराबादच्या कत्तलखान्याकडे नेली जात होती. रेपनपल्ली पोलिसांनी तीनही ट्रक पोलिस स्टेशनला लावून त्यातील ८० जनावरांना जीवदान दिले जखमी असलेल्या गायींचे उपचार करण्यात आले व त्यात काही मृत गायींचे अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास रेपनपल्ली पोलीस प्रशासन करत आहे .