सिरोंचा: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विजय झाला असल्याचे मत माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गडचिरोली गोंडवाना विद्यापीठचे नवनिर्वाचित सदस्य भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर) यांनी व्यक्त केले.
भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)म्हणाले की,राज्याचे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या हा विजय सर्वसामान्य जनतेचा हा विजय असून सर्वसामान्य नागरिकांनी धनशक्तीचा पराभव करीत शिस्तबद्ध प्रचार करीत हे यश संपादन केले आहे.
सिरोंचा तालुक्यातील सात(७)ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये ३ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तर ठेकडा(जाफराबाद ग्रामपंचायत मध्ये)(आविस व राष्ट्रवादी युती),भाजप १,बहुजन समाज पक्ष १,आणि आदिवासी विद्यार्थी संघटनेकडे १असं तर सर्वाधिक सरपंच व सदस्य जागा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आले आहे.सर्वसामान्य जनतेचा मी मनापासून आभार मानतो. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मी शुभेच्छा देतो.तळागळातील सर्वांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सातत्याने आपण पाठपुरावा करावा.
————————————————
एम.डी.शानू
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिरोंचा
सोशल मीडिया तालुका अध्यक्ष
तथा रा.युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष