पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी जागा लिजवर मिळावी

56

मदार डॉ देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांची मुख्यमंत्र्यांकडे संयुक्त मागणी

*प्रेस क्लबच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांना निवेदन*

दिनांक २०/१२/२०२२ नागपुर

*गडचिरोली शहरातील मौजा रामपूर तुकुम येथील सर्वे नंबर ९६ /१ एक आराजी ०.९५ हेक्टर आर आबादी पैकी ०.३४ हेक्टर जागा गडचिरोली प्रेस क्लबला नाममात्र भाड्याने लिजवर देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन आमदार डॉ देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांनी प्रेस क्लबच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांना नागपुर येथील विधानवनातील कक्षात दिले.*

*यावेळी प्रेस क्लबचे दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी अनिलजी धामोडे, आदिवासी माणूस चे संपादक सुरेशजी पद्मशाली, दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी अविनाशजी भांडेकर , गडचिरोली पत्रिकाचे संपादक विलासजी दशमुखे, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष रामरतनजी गोहणे प्रामुख्याने उपस्थित होते*

*गडचिरोली सारख्या जिल्हा केंद्रावर मोठ्या पत्रकार  भवनाची नितांत आवश्यकता आहे. त्या करिता प्रेस क्लब गडचिरोलीच्या माध्यमातून शासनाकडे पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी जागा  लिजवर  मिळावी याकरिता विनंती अर्ज करण्यात आलेला आहे.  त्यानुसार गडचिरोली शहरातील मौजा रामपूर तुकुम येथील सर्वे नंबर ९६ /१ एक आराजी ०.९५ हेक्टर आर आबादी पैकी ०.३४ हेक्टर जागा गडचिरोली प्रेस क्लबला नाममात्र भाड्याने लिजवर देणेनबाबतचा प्रस्ताव  मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी शासनाला पाठविलेला आहे. ०.३४ हेक्टर आर. जागेपैकी ३३२० चौ. फु.जागेवर पत्रकार भवन असून उर्वरित जागा लागूनच आहे. या जागेवर गडचिरोली शहरवासी यांच्या सेवेसाठी बहुउद्देशीय सभागृह व पत्रकार सहनिवासाचे बांधकाम करावयाचे आहे.  प्रेस क्लबचे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने सदर जागा घेवून बांधकाम करणे शक्य नाही. त्याकरिता ०.३४ हेक्टर जागा नाममात्र भाड्याने ९० वर्षासाठी लिजवर मिळावी अशी मागणी प्रेस क्लबच्या प्रतिनिधींसह आमदार डॉ देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली.*