अहेरी -आज दि. 20/12/2022 ला जेष्ठ नागरीक संघ अहेरी तर्फे मा. मूख्याधिकारी साळवे सा. यांना निवेदन देवून चर्चा करण्यात आली . चर्चचे. मूख्य विषय भूंजगराव पेठा कडे जाण्याच्या मार्गावर तलाव च्या बाजूला आरक्षित जागे संदर्भात विचारविनिमय करण्यात आले . आदरणीय भोसले सर यांनी सविस्तर विषयाची मांडणी करून त्या जमिनीवर जेष्ठ नागरीकांकरीता व गावातील जनते चे उपयोगी येन्या संदर्भात बगीचा , व तलावाला लागून शूशोभन करणे , भव्य असे हॉल बांधकाम करणे व यूवकांसाठी व्हॉलीबाल व इन्डोअर खेळासाठी बॅडमिंटन मैदान तयार करणे व 400 मी . चे पायी चालणे व धावण्या करीता ट्रक तयार करणे, नाना न्हानी उद्यान असे विषय नमूद करण्यात आले त्यावर मूख्याधिकारी सा. नगरपंचायत यांनी उत्तम असे पॉजटिव्ह प्रतिसाद दिले गावाच्या विकासाकरीता तत्पर असून जनरल बॉडीच्या सभा घेवून त्यावर चर्चा घडविण्यात येईल व जेष्ठ नागरीक संघाच्या पदाधिकारी व नगरपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सभापती व नगरसेवक यांची मेळघाट करून सर्व संगनमतानी नियोजन करण्याचे म्हटले आहे . चर्च मध्ये आदरणीय भोसले सर , गेडाम सा. आत्राम सा. निकूरे सर , बबलू सडमेक . श्रीमती कूडमेथे मॅडम श्रीमती छाया मॅडम उपस्थित होते.