जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा येथे संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन

54

अहेरी:- आज दिनांक 20 डिसेंबर 2022 रोज मंगळवार ला स्वच्छतेचे महान पुजारी संत गाडगेबाबा यांच्या 66 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी विनम्र अभिवादन केले. संत गाडगेबाबा यांचे महान कार्य विद्यार्थ्यांसमोर यावे. त्यांचा आदर्श त्यांनी घेऊन समाजात जीवन जगावे.यासाठी संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्याध्यापिका कल्पना रविवार यांनी त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला तर प्राथमिक शिक्षक  सुरजलाल येलमुले यांनी त्यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली व त्यांचा संदेश वाचून दाखवला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कल्पना रागिवार, प्रमुख पाहुणे सरस्वती धायगुडे कैवल्य फाउंडेशन, सुरजलाल येलमुले नीलिमा पातावार, अनंता सिडाम हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य गुरनुले तर आभार ज्योती वाडगुरे यांनी मानले.