आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन :संत गाडगे महाराजांचे सामाजिक शैक्षणिक व धार्मिक विचार आत्मसात करा

58

कुरखेडा:
     वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांनी आपल्या किर्तनरुपी सागरातून माणसाच्या मनातील घान साफ याचे कार्य केले त्यामुळे गाडगेबाबा यांचे शैक्षणिक सामाजिक धार्मिक विचार आत्मसात करून मानवाने प्रगती साधावी असे प्रतिपादन केले ते कुरखेडा येथे श्री संत गाडगे महाराज मंडळ कुरखेडा यांच्यावतीने श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी परवावर आयोजित भव्य विदर्भ स्तरीय खंजिरी भजन स्पर्धा या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक स्थानावरून बोलत होते यावेळी अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, सौ सहउद्घाटक नगरपंचायत चे गटनेते बबलू भाई हुसेनी तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव भाऊ फाये, नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रवींद्रजी गोटेफोडे, मार्गदर्शक अध्यक्ष जिल्हा सहकारी बोर्ड गडचिरोली वसंतरावजी मेश्राम ज्येष्ठ नेते विलास गावंडे नगरसेवक सागर निरंकारी नगरसेवक अतुल धुळे नगरसेविका दुर्गाताई गोटेफोडे नगरसेविका अल्काताई गिरडकर नगरसेविका आशाताई तुलावी शाखा व्यवस्थापक जी. डी .सी बँक कडोली उल्हास महाजन सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक मेश्राम, प्रा. विनोद नागपूरकर, विठल खानोरकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद नागपूरकर यांनी केले तर प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक मेश्राम यांनी केले तर आभार काळबांडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री संत गाडगे महाराज मंडळ कुरखेडा यांनी विशेष सहकार्य केले.