मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
सिंरोचा: टेकडा ताला, 18 मार्च 2025 – श्री कुंकुमेश्वर स्वामी जत्रेच्या निमित्ताने आदरणीय सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हळगेकर) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह टेकड्याला सदिच्छा भेट दिली. दिनांक 17 मार्च ते 19 मार्च दरम्यान सुरू असलेल्या या जत्रेच्या काळात ताईंनी भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय टेकडा ताला येथे येऊन शाळेच्या व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या प्रारंभात शाळेच्या प्राचार्य श्री शाहीद शेख सर आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ताईंचा शाल आणि श्रीफळ देऊन आदरपूर्वक सत्कार केला. ताईंच्या भेटीमुळे शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांमध्ये ग्रामपंचायत जाफराबादचे उपसरपंच श्री स्वामी गोदारी, माजी सरपंच श्री बापू सडमेक, पालक शिक्षक समितीचे प्रतिनिधी श्री अशोक पेदी, पोलीस पाटील श्री रवींद्र गाडे, सामाजिक कार्यकर्ते राकेश अंबिलापु, साई मंदा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ताईंच्या या भेटीद्वारे शाळेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे सर्व उपस्थितांनी सांगितले. ताईंच्या कार्यकर्त्यांशी असलेल्या संवादातून शाळेच्या उन्नतीसाठी काही उपयुक्त सूचना दिल्या गेल्या.
आदरणीय भाग्यश्रीताई आत्राम यांच्या या भेटीने शाळेतील वातावरणात एक नवा उत्साह व चैतन्य निर्माण केले.