अहेरी तालुक्यात अंगणवाडी पदभरतीत घोळ : CBI मार्फत चौकशी करुन दोषीवर कठोर कारवाई करा. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची मागणी..

309

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी : राज्यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील अनेक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदे खाली झाली होती.मात्र महाराष्ट्र सरकारने याची दखल घेत राज्यात संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यात पदभरतीचे आदेश जाहिर केला.त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात बालविकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत पदभरतीची जाहिरात काढण्यात आली.

त्यात अर्ज स्विकारण्यापासून तर नियुक्ती पर्यंत सर्व तारखा निश्चित करण्यात आल्या.त्यानुसार उमेदवारांनी अर्ज बालविकास प्रकल्प कार्यालयात सर्व कागदपत्रासह दिले गेले.या संपूर्ण अर्जाची छाननी करुन गुणानुक्रमे यादी प्रकाशित करावयाची होती.मात्र बालविकास प्रकल्प कार्यालयाने असे न करता जास्त गुण असलेल्या उमेदवारांच्या घरी व्यक्तिगत भेटी देऊन त्याच्याकडून पैशाची मागणी येथील अधिकारी व कर्मचारी करीत असल्याने.

या पदभरतीत मोठा घोळ होत असल्याची गंभीर तक्रार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ ककडालवार यांनी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री,जिल्हाधिकारी गडचिरोली,गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रचे खासदार,उपमुख्यकार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना तक्रार करुन चौकशी करण्याची मागणी केली आहे.