*अनिल कांदो तालुका* प्रतिनिधी चामोर्शी
मो.नं.९८३४४७५६८०
दिनांक -०९/०८/२०२५
चामोर्शी – येथे जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम सकाळी विधीवत पूजा करून सप्तरंगी झेंडा पडकवण्यात आला.त्यानंतर चामोर्शी शहरातील मुख्य रस्त्यावरुन आदिवासी संस्कृतीचे वाद्य,संगीत व वेशभूषा परिधान करून रॅली काढण्यात आले आणि सावतेली सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास कुळसंगे सेवा निवृत्त उपव्यवस्थापक महावितरण प्रमुख पाहुणे रेवणनाथ सेडमाके समाज सेवक, देवराव आलाम सेवानिवृत्त मुख्याध्यापक , रामचंद्र कोडापे,संध्या तिम्मा सदर कार्यक्रमात आदिवासी समाजगाता, संस्कृती, शिक्षण व अडचणी याबाबत सविस्तर मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले .
त्यानंतर आदिवासी समाजाचे सेवानिवृत्त कर्मचारी व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचे सत्कार करण्यात आले आणि उपस्थित सर्व आदिवासी बांधवाचे आभार मानुन कार्यक्रमाचे शेवट करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आॅल इंडिया कर्मचारी फेडरेशन शाखा चामोर्शीचे अध्यक्ष प्रशांत पोयाम उपाध्यक्ष दादाजी सेडमाके कार्य अध्यक्ष सचिन मडावी सरचिटणीस सुधाकर गेडाम कोषाध्यक्ष सचीन आत्राम सरचिटणीस सदाशिव मडावी युवा ध्यक्ष दिपक पुगांटी महिला प्रतिनिधी गिता परचाके संगठन प्रतिनिधी देवाजी तिम्मा, संजय हिचामी,दिगांबर पेंदाम, मच्छिंद्रनाथ हीचामी, चरणदास कांदो तसेच इतर सर्व आदिवासी बांधवांनी सहकार्य केले.