ना. एकनाथ शिंदे, ना. ॲड.आशिष आशिष जयस्वाल, पुर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाषग्राम येथे पार पडला शिवसेनेचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा

461

*विविध पक्षाच्या शेकडो पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेनेत प्रवेश*

*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार मोर्चेबांधणी सुरु*

*शिवसेना पक्षाचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे,गडचिरोली जिल्ह्याचे सहपालक मंत्री ना. आशिष जयस्वाल, पुर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 31 ऑगस्ट रविवारी चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे शिवसेनेचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला*.

*शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख आसिद मिस्त्री, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत, मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या शेकडो महीला व पुरुष कार्यकर्त्यांनी ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला*.

*येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी शिवसेना ॲक्शन मोडवर आली असुन या भव्य पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमातून शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणीला सूरवात केली आहे*.

*यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांनी सांगितले की,गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ना. एकनाथ शिंदे यांनी भरीव प्रयत्न केले असुन त्यांनी अनेक विकास योजना राबविल्या. आता सहपालक मंत्री आशिष जयस्वाल हे सुध्दा जिल्हाच्या विकासासाठी व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नरत आहे.शिवसेना आणि समाजसेवा हे एक समीकरण असून गोरगरिब, पीडित, वंचित सर्वसामान्याच्या अडचणीत धावून जाण्याचे कर्तव्य शिवसैनिक पार पाडू शकतात त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत शिवसेनेचा विचार त्यांचे ध्येय पोहोचवून शिवसेना मजबूत करावयाची आहे व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत शिवसेनेला भरीव यश संपादन करावयाचे आहे त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. व शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास दिला*.

*तसेच अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी पक्षवाढीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत करणे गरजेचे असुन गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेचा पक्षविस्तार करून येणाऱ्या निवडणुकात भगवा डौलाने फडकावयाचे आहे असे सांगीतले. यावेळी मिथुन विश्वास, समीर रॉय, संतोश रॉय,विकास मंडल मनीमोहन मंडल,अभिजीत वैद्य , सुजन ढाली,विकी ढाली आदेश मंडल प्रसन्नजीत साना,माणिक दास जीवन दास गुरुचंद मंडल,दीपक बाछाड,अनुप मंडल ,प्रदीप सरकार प्रताप रॉय,राहुल मंडल ,राजू हलदार धनंजय हलदार विश्वजीत हलदार,सुरेन हलदार संजय कर्माकर मनोजित रॉय ,जयदेव देवनाथ राजेश हलदार सरस्वती रॉय, संध्या विश्वास संकरी हलदार विशाखा मंडल,विभा मंडल रिता बाछाड, पूर्णिमा मंडल, सुनीता रॉय, संगीता मिस्त्री कांचन रॉय, दीपिका वैरागी, रीमा दास, विभा मंडल,गोविंद मल्लिक आशिष मंडल, निखिल हलदार, हरिपद सरकार,अरविंद दास, कपिल गाईन,संजय हलदार, नितेश बाछाड, राहूल हलदार, आशिष सरकार,प्रकाश मिस्त्री विजन विश्वास अमित मल्लिक , अभिजित मुजुमदार, विकास ठाकआ आदीसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा दुपट्टा घालुन पक्ष प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे नेते कपिल, पाल, संतोष बारापात्रे, आदींची उपस्थिती होती*