*उप संपादक : तेजेश गुज्जलवार*
दि. 29/ 1/2026
अहेरी: छलेवाडा येथून मेडाराम येथे देवदर्शन करून परतत असताना भाविकांवर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलेरो गाडी क्र. MH 33 A. 3955 आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या जबरदस्त धडकेत बुलेरोचा चालक वसंत चव्हान हा गंभीर जखमी होऊन कोमात गेला असून, वाहनातील आणखी 9 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर बुलेरोचा समोरचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने भूपनपाली येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, वेग आणि निष्काळजीपणा हे अपघातामागील कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
Home Breaking News देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात; बुलेरो–ट्रकची जबरदस्त धडक, चालक कोमात – 9 जण...







