प्रतिनिधी//
अहेरी: अहेरी तालुक्यातील चीरेपल्ली येथे दिनांक ९ आगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस उत्साहात आम्ही आमच्या आरोग्यासाठी आणि गावकरी चिरेपल्ली यांच्या संयुक्त सहभागातून कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात पारंपरिक ढोलताशाच्या गजरात व आदिवासी नृत्यात झाली.
या कार्क्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी गावातील
प्रतिष्ठित नागरिक भगवानजी मडावी, मुकुंदजी सोयाम, नीलाबाई जन्मा पेंदाम, ताराबाई चंदु पेंदाम, प्रमिला आनंदराव पेंदाम( CRP ) तसेच आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या तालुका सन्वयक संस्था मधील रजनीताई चौधरी, कृषी व पशू तज्ञ हरिदासजी कांबळे, सतीशजी पोरलावार, प्रीती बगमारे, आनंदरावजी टेलसे, समीर कोडापे, निखिल मादासवार, दीपा गावडे व गावातील महिलांचा, युवकांचा व ज्येष्ठ नागरिकांचा उ्स्फूर्त सहभाग होता.
या कार्यक्रमांतर्गत आम्ही आमच्या आरोग्यासाठी कृषी व पशू तज्ञ हरिदासजी कांबळे आणि रजनीताई चौधरी यांनी ‘ जागतिक आदिवासी दिवस’ या दिवसाप्रसंगी गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात केले. यामध्ये हा दिवस साजरा करण्याबाबतचा उद्देश म्हणजे जगातील आदिवासी लोकांच्या हक्कांना प्रोत्साहन देणे, त्यांचे संरक्षण करणे आणि पर्यावरण संरक्षणसारख्या जागतिक संस्थेमध्ये आदिवासी लोकांचे योगदान ओळखणे आदिवासी चा समजाच्या उन्नतीसह आदिवासी जमातींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची संस्कृती आणि प्रतिष्ठा जतन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आदिवासी या शब्दातील ‘आधी ‘ म्हणजे पूर्वीपासून/ आधीपासून आणि ‘ वासी ‘ म्हणजे वास्तव्य करणारे खूप पूर्वीपासून वास्तव्य होय; तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.