लकनगुडा येथील अपघातग्रस्त शालेय विध्यार्थ्यांची कंकडालवार यांनी करून दिली औषधोपचार

243

अहेरी : तालुक्यातील लकनगुडा येथील दोघें शालेय विद्यार्थी आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी त्यांचे भाऊजी सोबत अहेरीला आले होते.

आधार सेंटरकडे काम आटोपून घरी जात असतांना वाटेतच एका दुचाकीस्वराने त्यांना धडक देऊन पसार झाले होते. सदरहू अपघात बघून त्यांच्या सोबत आलेले त्यांचे भाऊजी सुद्धा भीतीने गावाकडे पळाले होते.

सदरहू घटनेची माहिती काँग्रेसचे प्रदेश महासचिव व जि.प. माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना कळताच त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन दुचाकीने अपघातग्रस्त झालेल्या मुलांवर उपचार करायला लावले.तदनंतर दोन्ही मुलांना आपल्या घरी नेऊन त्यांनी स्वतः त्यांना एका वडिलधाऱ्या माणसासारखं माणुसकीने जेवण वाळले.अपघातग्रस्त मुलांच्या जेवणानंतर त्यांच्या पालकांना माहिती देऊन अपघातग्रस्त मुलांना त्यांच्या पालकांना सुखरूप सु्फूर्द केले.

एखादं गावखेडातल्या मुलांना आपल्या बंगल्यावर आणून त्यांना स्वतः जेवण वाळवून त्यांची खात्रीपूर्वक काळजी घेत असल्याचे अजयभाऊ कंकडालवार यांचे चित्रफित हे खरोखरच त्यांच्यातली खरी मानवता दर्शवीत आहे.