गडचिरोली येथिल आदिवासी परधान समाज मंडळाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

85

*गडचिरोली* :- आज दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी आदिवासी परधान समाज मंडळ गडचिरोली येथील समाजाच्या वास्तूमध्ये ९ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन समाज बांधव व वार्डातील नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, समाजाचे प्रेरणास्थानतथा जिल्हयाचे शिल्पकार स्व. बाबुरावजी मडावी यांच्या प्रतिमांना आदिवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष श्री प्रदीप मडावी, वार्डातील ज्येष्ठ नागरिक मानसिंग सुरपाम, सुरज शेडमाके, समाज मंडळाचे युवा सदस्य महेंद्र मसराम, सुधीर मसराम, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजातील क्रांतिकारी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचा आदिवासी समाजाप्रती बहुमोल त्यागाची आठवण समाज बांधवांना करून दिली.

आदिवासी दिवस साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट १९९४ रोजी घोषित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित संविधानात आदिवासी समाजाच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली. जेणेकरून आदिवासी जमात विकासाच्या प्रवाहात आदिम जमातीच्या सर्वांगिक विकास करून देण्याचा प्रगतीत खारीचा वाटा उचलावा असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

आदिवासी एकता… जिंदाबाद….
“एक तिर एक कमान..सारे आदिवासी एक समान….”

अश्या नारेबाजी करत मोठा उत्साहात जागतीक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी युवा सदस्य अजय सुरपाम, आदिवासी विकास युवा परिषदचे रुपेश सलामे, विजय सुरपाम, अंकित कुळमेथे, आकाश कुळमेथे, नंदू कुंभारे, समाज मंडळाचे उपाध्यक्ष संजय मेश्राम,नेहाल मेश्राम,राज डोंगरे,अमोल कुळमेथे,राकेश कुळमेथे,यश कुळमेथे,प्रफुल वीरगमवार, विक्की मसराम ,योगेश कोडापे, विवेक वाकडे, महादेव कांबळे,अनिकेत बांबोळे,विक्की हजारे,नितीन शेडमाके,अजय सिडाम, रोहित आत्राम,साहिल शेडमाके,वैभव रामटेके,साहिल गोवर्धन, अंकुश बारसागडे,सचिन मरसकोल्हे,महिला सदस्य शालू सुरपाम,सुनिता मसराम,गंगा सलामे,पौर्णिमा कुळमेथे, गिता कुळमेथे, रेखा आत्राम,उपस्थीत होते.
सदर कार्यक्रमाचे अंकित कुळमेथे यांनी केले तर आभार रुपेश सलामे यांनी मानले.