प्रतिनिधी//
गडचिरोली :- जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले.
धानोरा मार्गावरील राणी दुर्गावती चौक येथे मालार्पण करत रॅलीचे आरंभ करण्यात आले व सांस्कृतिक सभागृहा येथे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन व सर्व संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रम स्थळी सांगता होत रॅली समाप्ती झाली.
सदर रॅलीचे नेतृत्व अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद,गडचिरोली जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे यांनी केले.
या रॅलीमध्ये समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक,युवती आदिवासी नृत्य करत हजारोच्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी उपस्थित संघटनेचे संपर्कप्रमुख बादल मडावी,रुपेश सलामे,पराग कन्नाके,दानु सिडाम,डेवीड पेंद्राम,कैलाश गेडाम,आदित्य येरमे,विशाल उईके,सुमित कुमरे,रोहित आत्राम यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.