जिं,प.शाळा रंगय्यापल्ली येथे नायक निवडणूक उत्साहात पार

233

प्रतिनिधी//

आज दिनांक 16 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, रंगयापल्ली येथे शाळा नायक व उपनायक पदासाठी निवडणूक अत्यंत शिस्तबद्ध व आनंददायी वातावरणात पार पडली. यामध्ये एकूण सहा उमेदवारांनी उत्साहाने सहभाग घेतला. उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे: साईना दुर्गम, नागराज येदांला, सहसा वैशाख, अक्षरा आघाडी, कावेरी गुरुनुळे व राहुल गुरुनुळे.

संपूर्ण मतदान प्रक्रियेनंतर सर्वाधिक मते मिळवून नागराज येदांला यांची शाळा नायकपदी तर साईना दुर्गम यांची उपनायकपदी निवड झाली. ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली.

या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाहीची मूलतत्त्वे, निवडणुकीची प्रक्रिया आणि मतदानाचे महत्व शिकण्याची अमूल्य संधी मिळाली. मतदार यादी, प्रचार, गुप्त मतदान, मतमोजणी व निकाल या सर्व टप्प्यांमधून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी उत्तम समन्वयातून केले. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि संघभावना निर्माण व्हावी हा उद्देश त्यांनी यशस्वीरीत्या साध्य केला.

शाळेतील शिक्षकांचे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी केलेले हे प्रयास निश्चितच कौतुकास्पद आहेत. ही निवडणूक शाळेसाठी एक प्रेरणादायी व स्मरणीय उपक्रम ठरली.