आसरअली येथील आजारग्रस्त संजय मारगोणी यांना भेट व आस्थेने विचारपूस

220

प्रतिनिधी//

सिरोंचा :तालुक्यातील असरअली येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते संजय मारगोणी यांनी गेल्या तीन महिन्यापासून पायाला जखम होऊन आजारग्रस्त असल्याने शिवसेना नेते संदीपभाऊ कोरेत यांनी त्यांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली आहे.
सिरोंचा तालुक्यात सर्वांचे परिचित व भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मारगौनी यांनी गेल्या तीन महिन्यापासून पायाच्या जखमेने आजार असल्याचे स्थानिक कार्यकर्ते संदीपभाऊ कोरेत असरअली दौऱ्यावर असताना माहिती दिली असता कोणत्याही प्रकारचा विचार न करता संजय मारगोनी यांना भेट देऊन आस्थेने विचारपूस करून मदत लागल्यास मदत करण्याचे अस्वसीत केले.
या प्रसंगी संदीपभाऊ कोरेत सह सुधाकर चापिडी, वसंत डुरके,प्रशांत नास्कुरी, रघु झाडे प्रशांत कुमरम सुधाकर कोरेत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.