जीवनाच्या वाटचालीत संस्कार होणे आवश्यक – माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम #jantechaawaaz#news#portal#

58

लापल्ली येथे श्रीराम मंदिरात
 आयोजित संस्कार शिबिरात राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले आवाहन.









आई,वडील,गुरू,व वडीलधाऱ्या माणसाचा मान राखून युवक, युवतींना निर्व्यसनी, चारित्र्यवान, निष्ठावंत व थोर व्यक्तिमत्वाचे धनी होऊन भविष्यातील स्वप्न पूर्तीसाठी संस्कार शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील श्रीराम मंदिरात आयोजित संस्कार शिबिरात केले.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामजयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली यांच्या ग्रामजयंती जिल्हाप्रचार समिती अंतर्गत आलापल्ली येथे संस्कार शिबीर व सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.

तर अध्यक्ष म्हणून भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचे राज्य विश्वस्त डॉ.शिवनाथ कुंभारे उपस्थित होते.मुख्य मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर येथील इंजिनअरिंग कॉलेजच्या प्रा.विशाखा सरणे,मार्गदर्शक 

म्हणून CRPF बटालियन ९ चे कमाडट ऑफिसर आर,एस,बालापूरकर, सुखदेव वेठे, प्राचार्य गजानन लोनबले,पद्मनाभ तुडूंलवार, सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे,संगीतकला शिक्षक संघटनेचा जिल्हाध्यक्ष धनपाल कार,मुनेश्वर हडपे,प्रा.पंडित पुडके, प्रा.भास्कर नरुले, जेंगठे, सामाजिक कार्यकर्ते व्येंकटेश मद्देर्लावार, आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना राजे साहेबांनी पुढे म्हणाले,दुराचारी व दुर्जन प्रवृत्तिकडे वळणाऱ्या व कुसंगती करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीना सुविचाराने सन्मार्ग दाखविण्याची गरज असून वारंवार व्यक्तीमत्व विकासाकरीता संस्कार शिबिराच्या माध्यमातून प्रत्येकाने व्यक्तिमत्व विकास साध्य करा व स्वावलंबी बना असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक चंद्रपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रा.विशाखा सरणे यांनी युवक,युवती व महिलांना मार्गदर्शनातून जीवनशैलीच्या विचारांना मंथन करायला लावले.त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, यांच्यासह थोर महात्म्यांचे संस्कार व इतिहास सांगून त्यांना जाती धर्मात सीमित न ठेवण्याचे आवाहन महिलांना केले.कार्यक्रमाचे संचालन रविंद्र ठाकरे, प्रास्ताविक प्रा.पद्मनाभ तुडूंलवार,व आभार मोहन मदने यांनी मानले.

कार्यक्रमास नानाजी ठाकरे,गुड्डू दुर्गे,संतोष मल्यालववार,पूनम बुद्धावार,जयप्रकाश शेंडे,माजी नगराध्यक्ष हर्षा ठाकरे,ज्योती कोमलवार,जयश्री नालमवार, गादेवर, बुरांडे, पल्लवी शेट्टे, अर्चना तलांडे,सुप्रिया गेडाम, स्वराज्य फौंडेशनचे अध्यक्ष सागर रामगोणवार,आदर्श केसनवार, दमयंती राजूरकर,सुप्रिया बुद्धावार,कोमल कामठे,वर्षा पेपंकवार,शारदा कांनाके,,विमल धुडसे,सोनाली भट्ट,प्रतीक्षा येवले,संस्कृती गोडशेलवार, विजय चरडुके,शरद पोलोजवार,अनिकेत निम्मलवार,वैभव कोमलवार,रोशन गोडशेलवार,यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व युवक,युवती उपस्थित होते.