मूलकला फाऊंडेशन तर्फे मद्दीकुंठा गावाचा इसमाला मदतीचा हात. #jantechaawaaz#news#portal#

42

सिरोंचा तालुक्यातील मद्दीकुंठा गावातील एक व्यक्ती मंगळवार ला दुपारी 4 वाजेपासून सिरोंचा मुख्यालय जवळील कोत्तागुडम येथे उन्हात थकून रस्त्याचा बाजुला पडून असल्याची माहिती 
 सिरोंचा – कोत्तगुडेम येथील नागरिकांनी मूलकला मदत फांऊंडेशनचे अध्यक्ष – सागर भाऊ मूलकला यांना दिली असता सागर भाऊला माहिती मिळताच लगेच  वेळ वाया ना घालवता सागर भाऊंनी त्यांचे टीमला सोबत घेऊन त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि  रस्त्याच्या बाजूला पडून असलेल्या इसमाला त्वरित क्षणाचाही विलंब ना करता सुखरूप सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले,
          त्या इसमाचे उपचार सुरू असून इसमाची संपूर्ण माहिती घेतली असता सदर व्यक्ती मद्दीकुंठा गावाचे असल्याचे माहिती मिळाली आहे,
त्यांचे नाव – रिक्कुला चिन्नबापू , वय अंदाजे – 50 असल्याचे सांगितले जात आहे.
      त्यावेळी मूलकला मदत फाऊंडेशनचे अध्यक्ष – सागर मूलकला, सदस्य – राजू मूलकला, स्वामीराज मूलकला, कल्याण मूलकला, उदय मूलकला, राजम मूलकला तसेच इतर गावकरी उपस्थित होते.