महाराजस्व अभियाना” मार्फत प्रशासन शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचावे. #jantechaawaaz#news#portal#

57

– राजे अम्ब्रीशराव महाराजांचे प्रशासनाल आवाहन

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या हस्ते “महाराजस्व अभियानाचे” ऊघ्दाटन.












*ऊपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस साहेबांच्या आदेशाने बंद पडलेले अभियान पुन्हा सुरु झाले









शासणाच्या योजना दुर्गमभागातील नागरीकांपर्यंत पोहोचत नसतात आणि पोहोचल्याच तरी तालुक्याला वारंवार तालुक्याला जावे लागेल म्हणुन नागरीक लाभापासुन वंचितच असायचे.कोणत्याही योजनांसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करणे हे गरीब निरक्षर जनतेसाठी अशक्यप्राय व्हायचे त्यावर ऊपाय म्हणुन महाराजस्व अभियानामार्फत शासनालाच जनतेच्या दारी पोहोचविण्याची योजना होती

 परंतु दुर्दैवाने बर्‍याच कालावधी पासुन ही योजना बंद होती. माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी राज्याचे ऊपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री देवेन्द्र फडणवीसांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली आणि या भागासाठी हे अभियान फार गरजेचे असल्याचे लक्षात आणुन दिले.देवेन्द्र फडणविस साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन हे अभियान पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला.अहेरी ऊपविभागात महाअभियान सुरु होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री संजय मिना यांनी राजे साहेबांना कळवले व प्रशासनामार्फत राजे साहेबांना ऊघ्दाटन करण्याससाठी पाचारण करण्यात आले.

ऊघ्दाटनाच्या प्रसंगी प्रशासनाला तळागाळात पोहोचण्याचे आवाहन केले.शेवटच्या व्यक्तीलासुध्दा योजनांचा लाभ पोहोचुन विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच जनतेने सुध्दा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

प्रसंगी ऊपविभागीय अधिकारी श्री अंकीत, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम,सरपंच किरण नैताम आणि इतर विभागाचे अधिकारी ऊपस्थित होते.