विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तात्काळ बस व्यवस्था शाहीन ताई हकीम यांची प्रशंसनीय तत्परता

87

आलापल्ली: दुर्गावती विद्यालय, आलापल्ली येथे शिक्षण घेणाऱ्या विविध भागांतील एकूण 350 विद्यार्थी दररोज शालेय बसेसद्वारे शिक्षणासाठी येत असतात. यामध्ये मूलचेरा मार्गावरील 65 सिरोंचा 50 एटापली 45तर भामरागड मार्गावरील 60 विद्यार्थ्यांचा समावेश आहे**

**मात्र दिनांक २६ सप्टेंबर रोजी नियोजित वेळेनुसार बसेस आलापली बस स्थानकावर पोहोचल्या नाहीत. विद्यार्थी बसची वाट पाहत थांबले असता, ही बाब शाहीन ताई हकीम यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली**

**शाहीन ताईंनी क्षणाचाही विलंब न करता थेट अहेरी बस डेपो गाठले व डेपो व्यवस्थापकांशी तातडीने संवाद साधला. मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी नेहमी उपलब्ध असणाऱ्या बसेस त्या दिवशी अनुपस्थित होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांनी तात्काळ चारही मार्गांवर बस व्यवस्था उपलब्ध करून घेतली आणि त्या आलापलीकडे रवाना केल्या*
**या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य लोनबले सर, प्रा. सरफराज आलम, शिनूभाऊ विरगूनवार, सुमित मोतकुरवार व सकील भाई हे उपस्थित होते**
**विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शाहीन ताईंनी दाखवलेली तत्परता आणि अहेरी बस डेपो जितेंद्र राजवैद्य साहेब दाखवलेली सहकार्याची भावना निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे**