जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पायल कुडमेथे ची चमकदार कामगीरी

359

गडचिरोली: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नागेपल्ली येथील सेंट फ्रान्सिस इंग्लिश मीडियम स्कूलची सातवी ची विदयार्थीनी कु. पायल कुडमेथे हिने 14 वर्ष वयोगटात चमकदार कामगिरी करत विभागीय स्तरावर आपली जागा निश्चित केली आहे. अतिशय दुर्गम भागातून येऊन आणि कठोर परिश्रमातून तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या जिस्मेरी मॅम, उपप्राचार्य रीमा मॅम, क्रीडा शिक्षक सत्यवान सर आणि इतर सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे.
हे यश तिने आपले आई-वडील, बहीण आणि सर्व शिक्षकांना समर्पित केले आहे. पायल कुडमेथेच्या या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.