युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांच्या हस्ते अहेरीत दांडीया महोत्सव २०२५ चे थाटात ऊघ्दाटन

67

*अहेरी:-* राजे फाऊंडेशन अहेरी मार्फत हाॅकी ग्राऊंड येथे नवरात्रोस्तव दरम्यान दरवर्षी दांडीया,गरबा व बतकम्मा महोत्सव साजरा केल्या जातो. यंदा पावसाच्या व्यत्ययामुळे घटस्थापणेच्या दिवशी ऊघ्दाटन होऊ शकले नव्हते मात्र युवकांचा ऊत्साह कमी होत नव्हता.कुमार अवधेशराव बाबा यांच्या हस्ते दुर्गापुजन करुन रीतसर दांडीया महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर युवकांनी मोठ्या ऊत्साहात नृत्य सादर केले.

प्रसंगी प्रविणराव बाबा, दांडीया ऊत्सव समितीचे अध्यक्ष संतोष मद्दीवार, विकास तोडसाम, मोरेश्वर कुमरम इत्यादी मान्यवर ऊपस्थित होते. यंदाच्या स्पर्धेत विविध शहरातील नामवंत स्पर्धक येणार असुन दांडीया,गरबा प्रेमींसाठी मेजवानीच असणार असल्याचे आयोजकांनी सांगीतले.