माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या सहकार्याने गोविंदपूर येथे भव्य फुटबॉल स्पर्धा आयोजित.

196

फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*मूलचेरा:-* तालुक्यातील बंगाली बहुल भागात प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात फुटबॉल स्पर्धा घेण्यात येतात.दरवर्षी प्रमाणे स्वामी विवेकानंद युवक मंडळ गोविंदपूर, यांच्या तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं आयोजन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

या फुटबॉल स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने फुटबॉल संघांनी सहभाग नोंदवला होता.2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत मोठ्या उत्साहात स्पर्धकांनी आपल्या संघाचं चांगल्या गुणवत्तापूर्ण प्रदर्शन केलं.
यावेळी प्रथम क्रमांक विजेत्या श्रीरामपूर संघाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या तर्फे 40 हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली तर द्वितीय क्रमांक विजेत्या सुंदरनगर संघाल समाजसेवक निखिल मंडल यांच्या हस्ते 25 हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली आणि तृतीय क्रमांक विजेत्या मथुरानगर(बाजार)संघाला माजी ग्रा.प.सदस्य राधाकृष्ण दास यांच्या हस्ते 6 हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.तसेच चतुर्थ क्रमांक विजेत्या राममोहनपूर संघाला सुजय बच्छाड यांच्या कडून 4 हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजसेवक निखिल मंडल तर प्रमुख पाहुणे म्हणून,सुजय बच्छाड,विश्वजित मंडल,प्रभाष मंडल,समीर अधिकारी,अशोक बडाल,विष्णू साना, राधाकृष्ण दास,वासुदेव मंडल,रणजित मिस्त्री तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.!