मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी: तेजेश गुजजलवार
गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील धुळेपल्ली गावात मागील तीन महिन्यांपासून वीजपुरवठा बंद असून, यामुळे गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) चे कॉ. सचिन मोतकुरवार यांनी या समस्येबाबत महावितरण विभागाला आठवड्याभरात वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. जर वेळेत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गावातील नागरिक वीजेअभावी शेतकाम, पाणीपुरवठा, आणि दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे CPI ने नेतृत्व करत तात्काळ वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
कार्यकर्त्यांची उपस्थिती:
या प्रसंगी कॉ. सुरज जक्कुलवार, दलसू गावडे, सुरेश मिंज, रमेश कुजूर, जयराम लकडा, दिनेश गावडे, रमेश गावडे, विष्णू तिरकी, बिरबल मिंज, रामजीत कुजूर, अरविंद मिंज आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी मिळून एकमताने महावितरण विभागावर दबाव टाकून ही समस्या सोडवण्याची भूमिका घेतली आहे.
आता येत्या आठवड्यात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर CPI आणि गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे…