मुलीच्या चित्याला अग्नी न देता बापाने आपली जीवनयात्रा संपवली; दोन कुटुंबांची झाली राखरांगोळी, तिघांचा जीव गेला

806

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मुलीने प्रियकरासोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर संबंधित मुलीच्या बापाने देखील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मुलचेरा तालुक्यात घडली आहे.

मुलचेरा : तालुक्यातील लक्ष्मीपूर गावालगत शेतातील झोपडीत युवक-युवतीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी (६ ऑक्टोबर) घडली होती.या घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले होते. मुलीचा शवविच्छेदन होत नाही इकडे बापाने देखील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना मुलचेरा तालुक्यातील विजयनगर गावात घडली.अमित अनिल रॉय (४०) आहे त्याचे नाव आहे.
जयदेब मिलन मंडल (वय २०, राहणार लक्ष्मीपूर),अमेला अमित रॉय (वय १८ राहणार विजयनगर) या प्रेमीयुगलांनी एकाच दोरीने गळफास घेतली होती. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली होती.रविवार सकाळच्या सुमारास लक्ष्मीपूर गावालगत असलेल्या धानाच्या शेतात गेलेल्या काही लोकांना एका शेतातील झोपडीत जयदेब मिलन मंडल आणि अमेला अमित रॉय या दोघांनी एकाच दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले होते.या घटनेची माहिती गावातील लोकांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.घटनेची माहिती मिळताच मुलचेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि पंचनामा करत असतानाच येथे मोठी गर्दी जमली होती.या गर्दीतून अमित अनिल रॉय हे कधी गायब झाले हे कळलंच नाही.इकडे शवविच्छेदनाची तयारी सुरू होती आणि तिकडे मुलीचा बाप गायब असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. गावात गेल्यावर मुलीच्या पित्याकडे मोबाईल असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच त्याचा मोबाईल ट्रॅकिंगवर टाकला.लोकेशन ट्रॅक होताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. अखेर रात्री ८ वाजता विजयनगर गावालगतच्या जंगलात अमित अनिल रॉय हे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले.अमित अनिल रॉय यांनी आपल्या दुचाकीने जंगलात गेले.एका झाडाखाली आपली दुचाकी ठेवून झाडाला गळफास घेत स्वतच्या दुचाकीवरून उडी घेतली.पोलिसांनी अखेर कालच रात्री त्याचाही मृतदेह शविच्छेदनासाठी मुलचेरा येथे पाठविले.जयदेब मंडल आणि अमेला रॉय या प्रेमी युगलांनी घेतलेल्या निर्णयाने दोन्ही गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केला.तरुण वयात त्या दोघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.त्यांनतर मुलीच्या चित्याला अग्नी देखील न देता मुलीच्या बापाने देखील गळफास घेतल्याने या घटनेत आता तिघांचा जीव गेला असून दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे