अन् भर पावसातही अडपल्ली माल येथे पार पडला शिवसेनेचा पक्ष प्रवेश सोहळा

99

*शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे , अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत, मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला, नगराध्यक्ष काशीनाथ कन्नाके, ओबीसी महीला आघाडी जिल्हाप्रमुख सुनीता कोकेरवार यांच्या उपस्थितीत शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेनेत प्रवेश*

*मूलचेरा तालुक्यातील अडपल्ली माल येथे दिनांक पाच ऑक्टोंबर रविवारी अभूतपूर्व असा शिवसेनेचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. पक्ष प्रवेश सोहळा सुरु होताच वरुणराजाच्या जोरदार सरींना सूरवात झाली मात्र या मुसळधार पावसातही शेकडो पुरुष व महीला कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत शिवबंधन हाती घेतले*.

*शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे , अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत, मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला, नगराध्यक्ष काशीनाथ कन्नाके, ओबीसी महीला आघाडी जिल्हाप्रमुख सुनीता कोकेरवार,वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरूण शेडमाके, संतोष बारापात्रे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला*.

*यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवसेनेचे मुख्य नेते ना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या शेकडो महीला व पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचें शतश आभार मानले. व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्व.आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन शिवसेनेचा विचार घराघरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करीत ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून पक्षात आले त्यांना योग्य तो न्याय देणार असल्याचे सांगीतले*.

*यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असतानाही कार्यकर्त्यांनी जो उत्साह दाखवला याचे भरभरून कौतुक करत पक्षाला अशा एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गरज असल्याचे सांगत त्यांचें आभारही मानले. व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकवून शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेला नव संजीवनी मिळत असुन जिल्हाभरात शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढत असुन ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहपालक मंत्री ना.आशिष जयस्वाल पुर्व विदर्भ संघटक किरण पांडव शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा गड अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला*.

*यावेळी दिग्वीजय गुरनुले लंकेश वाढई,संदिप वाढई. अंकीत गुरनुले महेन्द्र लोनबले आशिक शेंडे शुभम महाडोरे,
राजेश्वर कावळे,राहुल लोनबले,देवीदास शेंडे सुरज गुरनुले,दिलखुश कावळे,करन कावळे शुभम बावने तेजस वाढई संदिप गुरनुले,सुनिल प्रकाश कावडेअनिल कावडे समिर लोनबले शकुल कावडे देवा भोयर राज नेवारे,समीर भोयर,शंकर कावळे मयूर नेवारे,केतन नेवारे,सुशांत भोयर वैभव नेवारे,कीशोर भोयर,आशय नेवारे
रमेश नेवारे,निर्भय नेवारे, अक्षय भोयर,राजेन्द्र नेवारे,संजय सिडाम,अमित भोयर आकाश डोर्लीकर, राकेश टेकाम, सुरेंद्र वाढई , शुभम उराडे,सपना कावडे कविता नेवारे मनीषा शेंडे वैशाली भोयर स्मिता लोंढे सोनिया मोहुर्ले लता गुरूनुले ललिता येंचलवार वैशाली कुद्रपवाऱ, स्मिता गुरुनुले, आशा कावळे, रुपाली लोनबले, सुनंदा गुरुनुले, मनीषा गुरूनुले, अर्चना लोनबले, इंदिरा गुरूनुले माया कावळे, अनिता गुरुनुले सिंधुबाई लोनबले, वंदना लाडबावणे, बेबीताई गोंगले, उर्मिला गुरूनुले, रंजना शेंडे, आरती मडावी, लता दूधबावणे, सुनीता लोनबले, फुलाबाई शेंडे, सोनी लोनबले, संगीता कावळे, शोभा गुरूनुले, अल्का बोरूले, जयश्री गुरूनुले, रोषना कावळे मायाबाई उराडे, वागूबाई टेकाम, शिला आत्राम, आदींनी शिवसेनेचा दुपट्टा टाकत व शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला*.