मुलचेरा :- मौजा – लगाम ते मल्लेरा मुलचेरा जास्तीचे प्रवासी बस सुरु करण्यात यावे अशी मागणी आदिवासी विकास युवा परिषद मुलचेराच्या वतीने विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली करण्यात आली आहे.
सविस्तर असे कि, मौजा लगाम ते मल्लेरा मुलचेरा जास्तीचे प्रवासी बस सुरु करण्यात यावे यासाठी आज दिनांक ७/९/२०२४ रोजी संघटनेचा वतीने तालुकाध्यक्ष सतिश पोरतेट व परिसरातील नागरिक यांनी विषयास अनुसरून अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची भेट घेतली व या विषयावर चर्चा केली.
व यावेळी मंत्री.धर्मरावबाबा आत्राम यांनी विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली यांना बसेस सुरु करण्याबाबत सूचना दिल्या.
व अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा व परिसरातील नागरिकांच्या वतीने निवेदनही देण्यात आले.
अहेरी-महागाव-लगाम सकाळी ०९वा. व सकाळी १० वा.लगाम-मल्लेरा-मुलचेरा सकाळी १०.१५ वा व सकाळी ११.१५ वा.
मुलचेरा-मल्लेरा लगाम सकाळी ११.३०वा व दुपारी १२.३० वा
लगाम-मल्लेरा-मलचेरा दुपारी ०१.००वा व दुपारी ०२.०० वा.
मुलचेरा-लगाम-अहेरी दुपारी ०३.००वा व सायं. ०४.०० वा.
या प्रमाणे बसेस सोडण्यात यावे अशी मागणी आगार प्रमुख घागरगुंडे साहेब यांना दिलेल्या निवेदनातू केली आहे.
यावेळी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.