मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
काल दिनांक ०६/०९/२०२४ रोजी शुक्रवारला आलापल्ली येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार साहेब तसेच अहेरी विधानसभेचे विद्यमान आमदार तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य मा. श्री. धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काही मोजके पदाधिकारी यांनी लालसापोटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिनांक ०५/०९/२०२४ रोजी रियाज शेख व मनीष दुर्गे यांनी पदाचा राजीनामा दिला. आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेल आहे रियाज शेख यांचे खूप तक्रारी सुद्धा गेलेल्या होत्या आणि येणारा काही दिवसांमध्ये त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी सुद्धा करणार होते परंतु याची चाहूल त्यांना लागलेली होती त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाचा औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. विलास सिडाम नगरसेवक नगरपंचायत अहेरी व रियाज शेख यांची कन्या कुमारी नवरास रियाज शेख यांनी अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता परंतु त्यांना पुन्हा एकदा प्रवेश करण्यात आलेला आहे त्यामुळे रियाज शेख यांच्याबरोबर गेलेले हे पक्षातले नसून त्यांच्याच परिवारातील लोक आहेत. बाकी सर्व पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक अजूनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक आहेत. आजच्या या कार्यक्रमात काही पदाधिकाऱ्यांची नावे घेण्यात आलेले आहे आणि माझा सुद्धा नाव त्या ठिकाणी घेण्यात आला. रियाज शेख जिल्हाप्रमुख असताना त्यांच्याकडे विधानसभेची यादी होती त्यांनी तीच यादी त्या कार्यक्रमात जाहीर केली. मी आणि बाकी इतर अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते कोणीही पक्षप्रवेश केलेला नाही आमच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करून हेतू परस्पर बदनाम करण्याचं षडयंत्र ह्या लोकांनी केलेला आहे.
अहेरी विधानसभेतील इतर कोणतेही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांच्याबरोबर गेलेले नाही याची विद्यमान आमदार तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री. धर्मराव बाबा आत्राम साहेब आणि स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार साहेबांनी दखल घ्यावी व त्याची शहानिशा करावी. हा आमचा अपमान आहे, अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मन दुखावलेले आहे. मी हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत कडवट सच्चा शिवसैनिक आहे. मी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. मी आजही, उद्याही उद्धव साहेबांसोबतच आहे. मी प्रामाणिक होतो आजही आहे आणि सदैव राहणार. अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मन दुखावले आहेत व हा आमचा अपमान आहे. चुकीचा मेसेज पोहोचवण्याचा कट कारस्थान ह्या लोकांनी केलेला आहे या संपूर्ण घटनेचा आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी याचा खंडन करतो तसेच जाहीर निषेध करतो.
असे उत्तर युवासेनेचे तालुकाप्रमुख अक्षय पुंगाटी यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
याप्रसंगी श्री अक्षय पुंगाटी युवासेना तालुकाप्रमुख एटापल्ली, श्री नामदेव हिचामी पाणीपुरवठा सभापती नगरपंचायत एटापल्ली, श्रीमती अरुणाताई निकोडे तालुका महिला संघटिका (शहर), श्रीमती राजश्री ताई जांभुळकर तालुका महिला संघटिका (ग्रामीण), श्रीमती शालिनीताई नैताम उप तालुका संघटिका, श्री प्रमोद जी देवतळे तालुका संघटक, श्री रंजीत लेकामी विभाग प्रमुख, श्री ऋषभ दुर्गे शाखाप्रमुख तोडसा, अक्षय पाडाळी पुंगाटी शाखाप्रमुख डुम्मे, आकाश हिचामी शाखाप्रमुख, विशाल मेश्राम आधी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.