*आलापल्ली : गणेश चतुर्थी निमित्त माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या घरी श्री गणेशाचे आगमन झाले असून माजी आमदार दिपकदादा आत्राम सह सौ अनिताताई दिपकदादा आत्राम,कु.लेखणीताई आत्राम,पृथ्वीराज आत्राम यांनी श्री गणेशाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आले. माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी सुखकर्त्याने अहेरी विधानसभा क्षेत्रातल्या जनतेच्या दुःखाची हरण करून सुखी व समृद्ध करावे अशी कामना श्री गणरायाला केली.यावेळी त्यांनी गणेश चतुर्थी निमित्त समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या.*
*याप्रसंगी परिवारातील सदस्यासह वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,संजय आक्केवार,प्रशांत मित्रावार,महेश सडमेक,संदीप बडगे,जुलेख शेख,जुनेद शेख,विनोद कावेरी,नितीन खोब्रागडे,रोशन बोरे,हरिदास ठोंबरे,तरून मलगाम,माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते*