आलापल्ली येथे बंगाली नववर्षानिमित्त “कृष्णपूजा” उत्साहात संपन्न. माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची विशेष उपस्थिती.

35

*आलापल्ली:-* बंगाली नववर्षाच्या निमित्ताने आलापल्ली येथे श्रीकृष्ण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बंगाली बांधव उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात उत्साहाने सहभाग नोंदविला.

यावेळी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी उपस्थित राहून सर्व बंगाली बांधवांना ‘बंगाली नवीन वर्षा’निमित्ताने शुभेच्छा दिल्या.तसेच त्यांनी बंगाली बांधवां सोबत पारंपरिक नृत्य करत आनंद द्विगुणित केला.

या कार्यक्रमादरम्यान श्रीकृष्ण पूजन,भजन-कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या उत्सवामुळे परिसरात भक्तीमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.एकूणच,बंगाली नववर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने सामाजिक ऐक्य व सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश दिला.

यावेळी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, जिल्हा सचिव अभिजित शेंडे, तालुका अध्यक्ष विकास तोडसाम, पेसा अध्यक्ष दीपक तोगरवार,सागर कोहळे, राजस्मित पोचमपल्ली तसेच स्थानिक गावकरी उपस्थित होते!