अडचणीच्या क्षणी धावले मदतीला; राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून रुग्णासाठी रुग्णवाहिकेची तात्काळ व्यवस्था.

237

पेरमीलीतील गंभीर रुग्णाला नागपूर एम्समध्ये उपचारासाठी पाठवले; भाजप कार्यकर्त्यांचीही तत्पर साथ.

*अहेरी:-* मानवतेचा जिवंत आदर्श पुन्हा एकदा समोर आला असून, अडचणीत सापडलेल्या रुग्णासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. पेरमीली येथील उमेश बाबुराव तलांडे हे गंभीर आजाराने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील एम्स दवाखान्यात हलविणे गरजेचे होते.

आर्थिक अडचणींमुळे खासगी वाहनाची व्यवस्था करणे शक्य नसल्याने रुग्ण कुटुंबीय हतबल झाले होते. ही बाब समजताच राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. यासोबतच त्यांनी आर्थिक मदतही उपलब्ध करून दिली, ज्यामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.

या संपूर्ण मदत कार्यात भाजपचे तालुकाध्यक्ष विकास तोडसाम आणि इतर कार्यकर्त्यांनीही तत्परतेने सहभाग घेत रुग्णाला सुरक्षितपणे नागपूरला रवाना करण्यास सहकार्य केले.