सिरोंचा: तालुक्यातील नगरम येथे होणाऱ्या गंगादेवी पूजेसाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आर्थिक मदत केली.
सिरोंचा तालुक्यात नगरम येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गंगादेवी पूजा मोठ्या उत्साहाने साजरा केले जात आहे.या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होत आहेत.सदर कार्यक्रमासाठी आयोजकांना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून मोठ्या निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सिरोंचाचे पदाधिकारी,नगर सेवक सतीश बोगे,रवि सुल्तान, ओमप्रकाश ताटीकोंडावार, सलाम शेख़ रमेश गादमवार आदी मान्यवर उपस्थित होते.