मल्लेरा येथे बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केजिकराव आरके इंडिया दस्तक न्युज मुलचेरा तालुका प्रतिनिधी

252

*मुलचेरा* :- इंडिया दस्तक न्युज प्रतिनिधी । मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथे पारंपारिक पध्दतीने बैलपोळा सण सोमवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी उत्साहात साजरा करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेल्या मल्लेरा येथे सोमवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी पारंपारिक पध्दतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला. शेतकरी बांधवांनी‌ सकाळपासून आपल्या बैलांची सजावट करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गावातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळ असलेल्या माता मंदिर व हनुमान मंदिर येथे जावून बैलांकडून फेऱ्या  आले. त्यानंतर तेथुन वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गावातील मुख्य चौकात शेतकरी बांधवांनी आपला बैलांना एकत्र करून. गावातील मुख्य चौकात उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. त्यानंतर शेतकरी बांधवांनी आपल्या घरी बैलजोडीला नेवून त्यांना नैवैद्य देण्यात आले. यावेळी मल्लेरा माजी पो. पा. श्री.देवाजी ओडेंगवार ग्रा.प.उपसरपंच सौ. उज्वला मरापे  ग्रा.प.सदस्य रेखनकर  गर्तुलवार ग्रा.प.सदस्य  रामेश्वर तोरे ,प्रभाकर मरापे,बाबुराव चौधरी ,नामदेव दुर्गे,विकास दुर्गे ,वसंत ईष्टाम ,नानाजी आत्राम, विनोद मुत्येलवार, विजय सिडाम, आनंदराव मडावी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते