वडिलांच्या अंत्ययात्रेत चार मुलींनींच दिला खांदा आणि पकडला आखटाही मुलींचा हक्क बजावला . –

527

सिरोंचा: पुरुषप्रधान संस्कृतीत दिला सामाजिक संदेश ,पित्याच्या अंत्यविधीला मुलींनी दिले पूर्णत्व . रंगय्यापल्ली येथील समाजसेवी पिता नारायण अंकुलु कुम्मरी यांची अंत्ययात्रा . या अंत्ययात्रेत खांदा दिला . आकटे पकडले अन माती पण दिला . चार मुलींनी पार पाडले अंत्यविधी . रंगय्यापल्ली / सिरोंचा – मुलगा म्हणजे वंशाचा दिवा तर मुलगी म्हणजे परक्याचे धन ही मानसिकता अजुनही स्वतंत्र भारताच्या भुमीत समाजात लोप पावलेले नाही. परंतु मुलगा नसतांना ही विवाहित मुलींनीच मुलगा बनुन वडिलांच्या अंत्यसंस्काराने सोपस्कार पार पाडले . रंगय्या पल्ली येथे मुलींनीच आखटा , मडके व ताट पकडून वडिलांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व केले . या परिसरातील आदर्श शेतकरी , समाजसेवी आणि राजकिय अनुभवी तसेच कृषी तज्ञ पित्याच्या अंत्ययात्रेत त्यांच्या चार मुलींनीच पार पाडलेले हे कर्तव्य व कर्तबगार मुलीं बाबत चर्चेचे विषय झाले आहे. रंगय्यापल्ली येथील नारायण अंकुलु कुम्मरी वय ९१ यांचे दि. २१ / ३ / २०२४ रोजी निधन झाले .