एटापल्ली येथे १२ विद्यार्थिनींना सायकलचे सायकलचे वितरण
मुलींना शाळेपर्यंतचा प्रवास झाला सुकर.
एटापल्ली: जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे १२ विद्यार्थिनींना सायकलचे सायकलचे वितरण करण्यात आले
मानव विकास मिशन माध्यमिक (शिक्षण विभाग) अंतर्गत दिनांक १२। मार्च २४रोजी जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्लीच्या परिसरात मा. विनय चव्हाण मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले ह्या वितरण सोहळ्यात शाळेचे शिक्षक व शिक्षका तसेच कर्मचारी व्रुंद होते.
विद्यार्थिनींना सायकलचे मोफत प्राप्तीमुळे जाण्या-येण्याचा मार्ग सुकर झाल्यामुळे मुलींना व पालकांना आनंद झाला होता. एकंदरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पालकांनी शाळा प्रशासनाचे आभार मानले.