सिरोंचा हनुमान मंदिर सभा मंडप बांधकाम होणार पूर्ण.
सिरोंचा: तालुक्यातील प्रसिद्ध भक्तांजानेय हनुमान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर हनुमान भक्तांची वर्दळ असते,मोठ्या भक्ती-भावाने भक्तगण हनुमान मंदिरात येऊन पूजा-अर्चना करत असतात.त्यामुळे भक्तांना बैठक सुविधा व्हावी यासाठी एक सभा मंडप बांधकाम करण्यास सुरुवात करण्यात आली.पण बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचण भासत होती.ही माहिती हनुमान मंदिर कमिटीने अहेरी इस्टेटचे राजे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना दिली.त्यावेळी राजे साहेबांनी आपल्या स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हनुमान मंदिर सभा मंडपसाठी 1,05,000/- रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य खरेदी करून पाठविले.
तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी हनुमान मंदिर परिसरात भक्तांना पाण्याची सुविधा व्हावी म्हणून बोरवेल (हॅंडपम्प) सुध्दा करून दिले हे विशेष
यावेळी रुपये 1,05,000/- किमतीचे बांधकाम साहित्य खरेदी करून दिल्याबद्दल सर्व हनुमान मंदिर कमिटीने माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे मनःपूर्वक आभार मानले..!
भाजपा तालुका अध्यक्ष शंकर नरहरी,सिरोंचा शहर अध्यक्ष दिलीप सेनिगारपू,तालुका महामंत्री सीतापती गट्टू,ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश मुंगीवार,सोशलमीडिया प्रमुख नागेश ताडबोईना,युवा मोर्चा उपाध्यक्ष संदीप गंजी,हनुमान मंदिर कमिटी सद्स्य व हनुमान भक्त उपस्थित होते.