आदर्श आचारसंहितेचे पालन करा – जिल्हाधिकारी संजय दैने कलम १४४ अन्वये विविध बाबीना मनाई

174

गडचिरोली, (जिमाका) दि.17: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने दिनांक 16 मार्च पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात विविध बाबींवर निर्बंध लागू केले आहे. निर्बंध आदेश निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत अंमलात राहणार असून संबंधीत सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे
********