बोनालु उत्सवाला माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई यांची उपस्थिती मल्लिकार्जुन स्वामींचे घेतले दर्शन

89

मल्लिकार्जुन स्वामींचे घेतले दर्शन

कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले ताईंचे स्वागत

सिरोंचा:- तालुक्यातील आरडा गावात असलेल्या मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात 24 व 25 डिसेंबर रोजी शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या बोनालू उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या उत्सवात माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी सहभागी होत मल्लिकार्जुन स्वामींचे दर्शन घेतले.

आरडा गावात असलेल्या मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात जत्रा भरते यावर्षी सुद्धा जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे मल्लिकार्जुन स्वामी यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगाना व छत्तीसगड राज्यात आहेत. त्यामुळे दरवर्षीच या ठिकाणी मोठी गर्दी होते. यावर्षी सुद्धा मल्लिकार्जुन स्वामींचे दर्शन घेऊन पूजाअर्चा करण्यासाठी भक्तगणांची मोठी गर्दी बघायला मिळाली.

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई यांनी पहिल्याच दिवशी याठिकाणी भेट देत पूजाअर्चा करत मल्लिकार्जुन स्वामींचे दर्शन घेतले.सिरोंचा तालुक्यातील ही सर्वात मोठी जत्रा असून तीन राज्यातील भाविकांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बॅनरही लावण्यात आले.ताईंचे आरडा येथील मंदिरात आगमन होताच बोनालू उत्सव कमिटी तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक रवी रालबंडीवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कृष्णमूर्ती रिकुला, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष मदनया मादेशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रींचा तालुकाध्यक्ष एम डी शानु, रवी सुलतान,देवय्या येनगंदुला, सिद्दीकी भाई, आरडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.